नवी दिल्ली : सध्या लॅपटॉपचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. लॉकडाऊननंतर ‘वर्क फ्रॉम होम’चे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लॅपटॉप खरेदीला पसंती दिली जात आहे. जर तुम्ही आता लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. नाहीतर मोठा तोटा होण्याची जास्त शक्यता असते.
जर तुम्ही नवीन लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला लॅपटॉपची स्क्रीन किती मोठी हवी हे आधी ठरवा. तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करता यावरही ते अवलंबून असते. यासोबतच मोठा लॅपटॉप घेऊन तुम्ही कुठेही प्रवास करू शकाल का? याची आधी माहिती घ्या. नंतर मोठा लॅपटॉप घेण्याचा विचार करा. जर तुम्ही पहिल्यांदा किंवा पुन्हा नवीन लॅपटॉप आणण्याचा विचार करत असाल तर लॅपटॉपच्या रॅम आणि प्रोसेसरची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
लॅपटॉपमध्ये रॅम कमी असेल तर हेवी फाईल्स चालू असताना लॅपटॉप लवकर हँग होऊ लागतो. तसेच, कमी पॉवर प्रोसेसर लॅपटॉपच्या कार्यक्षमतेवर परिणाम करेल. बॅटरी आणि चार्जिंग लॅपटॉपसाठी खूप महत्वाचे आहे. लॅपटॉपची बॅटरी जास्त असेल तर तुम्ही लॅपटॉपवर जास्त वेळ काम करू शकता. लॅपटॉप घेण्यापूर्वी लॅपटॉपमध्ये फास्ट चार्जिंगचे फीचर आहे की नाही याचीही माहिती घ्या.