नवी दिल्ली : सध्या मार्केटमध्ये अनेक कॅमेरे उपलब्ध आहेत. त्यानुसार, त्यांचे फिचर्सही जबरदस्त आहेत. त्यात Fujifilm ने एक नुकताच Instant Camera मार्केटमध्ये आणला आहे. Instax WIDE 400TM हा लेटेस्ट कॅमेरा लाँच केला असून, instax mini असं त्याचं नाव आहे.
Fujifilm चा हा कॅमेरा LiPlayTM मध्ये नवीन कलरमध्ये येतो. यातील instax WIDE 400TM हा वापरायला सोपा असून, गट शॉट्ससह वाईड फॉरमॅट अॅनालॉग इन्स्टंट कॅमेरा आहे. हा नवीन कॅमेरा मॅचा ग्रीन, मिस्टी व्हाईट आणि डीप ब्रॉन्झ या कलरमध्ये उपलब्ध आहे. अॅनालॉग झटपट कॅमेऱ्यांच्या Instax सीरिजमधील हा कॅमेरा आहे.
हा अॅनालॉग इन्स्टंट कॅमेरा डबल-कार्ड-आकाराच्या वाईड फॉर्मेटशी सुसंगत होण्यासाठी डिझाईन केला आहे. फिल्म कॅमेरा साध्या टर्न ऑनसह चांगले शॉट्स कॅप्चर करतो आणि शटर बटणचा वापर करता येऊ शकतो. या कॅमेराच्या माध्यमातून मोठा ग्रुप असो वा लँडस्केप्स याचे फोटो अगदी सहज घेता येऊ शकतात.