नवी दिल्ली : सणासुदीला ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सकडून अनेक ऑफर्स आणले गेल्या होत्या. मात्र, आता डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच फ्लिपकार्टवर सेल सुरू झाला आहे. Flipkart Big Bachat Days Sale असे या सेलचे नाव आहे. हा सेल 1 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या सेलदरम्यान अनेक वस्तूंवर सूट मिळणार आहे.
Flipkart Big Bachat Days Sale सह, अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काउंट उपलब्ध आहेत. या सेल दरम्यान, Xiaomi Redmi, Samsung, Vivo आणि इतर अनेक ब्रँड्सच्या हँडसेटवर सूट मिळत आहे. Flipkart Big Bachat Days Sale दरम्यान iPhone 15 स्वस्तात अर्थात डिस्काउंटमध्ये घेता येऊ शकणार आहे. Apple iPhone 15 हा 59,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या फोनची मूळ किंमत 70 हजार रुपये आहे. मात्र, आता हा फोन डिस्काउंटमध्ये दिला जात आहे.
Apple iPhone 15 मध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून, याचे 1179 x 2556 पिक्सेल रिझोल्यूशन आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी यामध्ये सिरॅमिक शील्ड ग्लास वापरण्यात आला आहे. Apple iPhone 15 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48MP आहे, तर सेकंडरी कॅमेरा 12MP आहे.
तसेच यात 12MP सेल्फी कॅमेरा आहे. चार्जिंगसाठी USB Type-C 2.0 चा वापर करण्यात आला आहे. सध्या हा फोन डिस्काउंटमध्ये तुम्हाला मिळत आहे.