घराला कधी कुलूप असलं की चावी कुठं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. कुलूप असलं की चावीही त्याच्यासोबत लागतेच. पण घराला कुलूप असले, तरी चावी योग्य ठिकाणी ठेवण्याचे टेन्शन असते. त्यामुळे आता ही समस्या टाळण्यासाठी फिंगरप्रिंट बायोमेट्रिक पॅडलॉक येत आहे. हे एक साधंसुध लॉक नाहीतर फिंगरप्रिंट लॉक आहे.
जसे सामान्य कुलूप चावीने उघडते तसं हे कुलूप चावीने उघडत नाही. तर हे कुलूप उघडण्यासाठी लॉक सिस्टम असून, ते तुमच्या बोटांच्या ठशांनी उघडेल. म्हणजे चाव्या ठेवण्याच्या त्रासातून तुमची सुटका होईल. हेरलिच होम्स फिंगरप्रिंट पॅडलॉक हा एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. हा फिंगर प्रिंट पॅडलॉक तुमच्या अनेक समस्या सोडवू शकतो. या लॉकच्या मदतीने तुम्ही फिंगर प्रिंटने तुमचे लॉक अनलॉक करू शकता. यामध्ये एकाच वेळी दोन लोकांच्या बोटांचे ठसे जोडता येतील.
इतकंच नाहीतर तुम्ही ते USB केबलने चार्जही करू शकता. या लॉकच्या वापरामुळे आपल्या सोबत चावी ठेवण्याची चिंता आता मिटणार आहे. याशिवाय, एस्कोझोर स्मार्ट हेवीड्युटी फिंगर प्रिंट पॅडलॉक हा देखील चांगला पर्याय आहे. हा फिंगर प्रिंट पॅडलॉक अॅप सपोर्टसह येतो.
हे लॉक तुम्ही त्याचे अॅप गुगल प्ले स्टोअर किंवा ऍपल अॅप स्टोअरवरून इन्स्टॉल करू शकता आणि मोबाईलवरून तुमची लॉक सिस्टम नियंत्रित करू शकता. या लॉकचा वापर करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.