सध्या व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. चॅटिंग ॲपद्वारे लोकांना कॉल करणे, फोटो, व्हिडिओ आणि फाईल शेअर करणे आवडते. व्हॉट्सॲपमध्ये असे अनेक फीचर्स आहेत जे Meta अंतर्गत येतात. त्यात आता तुम्हाला WhatsApp Call वर आवडतं गाणं ठेवता येणार आहे.
WhatsApp वरील रिंगटोन फिचर आता आणले जात आहे. अनेकदा व्हॉट्सॲप कॉलिंगद्वारे लोकांशी काही कामानिमित्त बोलत असता, तर तुम्हाला हे फीचर आवडू शकते. व्हॉट्सॲप युजर्सला कॉलिंग दरम्यान रिंगटोन बदलण्याची सुविधा मिळू शकणार आहे.
अशाप्रकारे व्हॉट्सॲप कॉलसाठी रिंगटोन करता येईल सेट
– तुमच्या डिव्हाईसवर WhatsApp उघडा आणि नंतर वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.
– यानंतर सेटिंग ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर नोटिफिकेशन ऑप्शनवर टॅप करा.
– यानंतर तुम्हाला थोडे खाली यावे लागेल आणि नंतर कॉलवर क्लिक करावे लागेल.
– आता तुम्हाला रिंगटोन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
– त्यानंतर तुम्हाला ऑडिओ किंवा म्युझिक फाईलवर टॅप करावे लागेल.
– यानंतर तुम्ही WhatsApp रिंगटोनसाठी तुमच्या आवडीचे कोणतेही गाणे निवडू शकता.