नवी दिल्ली : रात्रीच्या वेळी घरातील लाईट गेली की जवळपास सर्वच कामं खोळंबतात. मग तेव्हा काय करावं काय नको हे समजत नसते. मोबाईलमधील टॉर्चचा वापर देखील केला जातो. मात्र, सध्या मार्केटमध्ये असे काही बल्ब आहेत ते लाईट असताना चांगले प्रकाश देतात. इतकेच नाहीतर जेव्हा लाईट जाते तेव्हा ते आपोआप सुरु देखील होतात.
Halonix या कंपनीचा बल्ब एलईडी लाईटसह Inverter मध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो. जेव्हा घरातील लाईट जाते तेव्हा हा बल्ब सुरु होता. पण हा बल्ब विद्युत पुरवठा होणाऱ्या बल्बच्या सॉकेटमध्ये घातलेला असावा. Halonix Prime असे या बल्बचे नाव आहे. हा बल्ब 9W असून, तो एक Rechargeable Emergency Led Bulb आहे. हा बल्ब ऑनलाईन खरेदी करता येऊ शकतो.
अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवर हा बल्ब उपलब्ध असून, तो ग्राहकांना परवडणाऱ्या दरात म्हणजेच 299 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या बल्बला एक वर्षांची वॉरंटीही देण्यात आली असून, अॅमेझॉनवर रिप्लेसमेंटचा पर्यायही देण्यात आला आहे.