नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीच्या युगात अनेक नवंनवी उपकरणे अर्थात गॅजेट्स लाँच होत आहेत. त्यात स्मार्टफोन्सनंतर स्मार्टवॉचला प्राधान्य दिले जात आहे. हीच गरज लक्षात घेता प्रसिद्ध कंपनी Elista चे तीन नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहेत. हे ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच आहेत, ज्यात मल्टीपल स्पोर्ट मोडसह मोठी बॅटरी लाईफ मिळते.
एलिस्टा स्मार्टरिस्ट E-1 आणि E-2 स्मार्टवॉचमध्ये 2.01 इंचाचा मोठा आयपीएस ऑलवेज ऑन डिस्प्ले देण्यात आला आहे. वॉच स्लीक मेटल आणि व्हायब्रेंट ऑलवेज ऑन कलर टच स्क्रीनसह येत आहेत. यामध्ये स्टाईल आणि स्पोर्टसह फिटनेस फ्रेंडली फीचर्स देण्यात आले आहेत. हे सर्व ‘मेड इन इंडिया’ स्मार्टवॉच आहेत, ज्यात ब्लूटूथ कॉलिंगचा सपोटही मिळत आहे. ‘डू नॉट डिस्टर्ब’, वेदर अपडेट, म्यूजिक कंट्रोल, स्टॉपवॉच, पासवर्ड लॉक, कॅल्क्युलेटर, फ्लॅशलाइट आणि कॉल रेकॉर्डिंगची सुविधा यात मिळत आहे.
यामध्ये हेल्थ आणि फिटनेस मॉनिटरिंग फीचर देण्यात आले आहेत. वॉचमध्ये SpO2 मॉनिटरिंग, हर्ट रेट मॉनिटर, ब्लड प्रेशर मॉनिटर, स्लीप मॉनिटर आणि पॅडोमीटर देण्यात आले आहे. एलिस्टा स्मार्टरिस्ट ई-सीरीजमध्ये व्हॉईस असिस्टंटचा सपोर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर बिल्ड-इन मायक्रोफोनची सुविधा मिळते, ज्याच्या मदतीने कॉलिंग करता येते. एलिस्टाचे हे स्मार्टवॉच 1,599 रुपयांपर्यंत मिळू शकते.