Pune Prime News : सध्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यानुसार, अनेक सोशल मीडिया ऍप्सचा वर्गही मोठा आहे. त्यापैकी एक म्हणजे इन्स्टाग्राम. इन्स्टाग्रामने आता असे एक फीचर आणले आहे, जे तुमचे फोटो एडिट करण्यास मदत करेल. कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित बॅकग्राउंड फीचर जारी केला आहे. यामुळे आता तुमचे फोटो अगदी परफेक्ट एडिट होणार आहे.
सर्वप्रथम तुम्ही एक सेल्फी काढा किंवा तुमच्या फोनमधील कॅमेरा रोलमधून एक फोटो निवडा. तुमच्या इन्स्टाग्राम स्क्रीनवरील स्टोरी आयकॉनवर क्लिक करा. एकदा तुमचा फोटो एडिटिंग स्क्रीनवर आला की, वरच्या उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या तीन डॉटवर टॅप करा आणि मेनूमधून ‘बॅकड्रॉप’ निवडा. नंतर इन्स्टाग्राम तुमच्या फोटोमधील बॅकग्राउंड आणि माणसे आदी विविध घटकांचे विश्लेषण करेल. या प्रक्रियेसाठी थोडा वेळ जाईल.
तुम्ही तुमच्या फोटोमधील विविध क्षेत्रे निवडू शकता. नवीन बॅकड्रॉप तयार करताना तुमच्याद्वारे न निवडलेली क्षेत्रे एआयद्वारे बदलली जातील. हे सगळे बदल झाल्यानंतर Next वर टॅप करा. बॅकड्रॉपसाठी इंग्रजीमध्ये एक सूचना द्या. हे AI ला नवीन बॅकड्रॉप तयार करण्यात मार्गदर्शन करेल. त्यानंतर तुम्हाला एक मजकूर दिसेल. ‘तुम्हाला बॉक्स तिथे हव्या असलेल्या बॅकड्रॉपचे वर्णन करा” असे विचारले जाईल. प्राण्यांपासून ते फुलांपर्यंत तुम्हाला आवडेल ते वर्णन त्या बॉक्समध्ये नमूद करा. त्यानंतर नेक्स्टवर (Next) टॅप करा.
तुमच्या Prompt वर आधारित दोन बॅकड्रॉप पर्याय तयार केले जातील. दिलेले पर्याय तुम्हाला पसंत नसतील तर त्याच Prompt चा वापर करून दुसरे बॅकड्रॉप निर्माण करण्यासाठी रिफ्रेश चिन्हावर टॅप करा. Prompt बदलण्यासाठी तळाशी टॅप करा. तुम्हाला आवडणारा पर्याय निवडा आणि नेक्स्टवर टॅप करा.