नवी दिल्ली : सध्या अनेक जबरदस्त असे गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्यात आता प्रसिद्ध कंपनी Edifier ने आपले नवीन Edifier HECATE G2 वायरलेस हेडफोन लाँच केले आहेत. यात 50mm डायनॅमिक सेटअप देण्यात आला आहे. याच्या माध्यमातून चांगली साऊंड क्वालिटी अनुभवता येऊ शकते.
Edifier HECATE G2 या वायरलेस हेडफोनमध्ये 70dB चा हाय सेन्सिटीव्ह मायक्रोफोन आहे. हा हेडफोन बाहेरचा आवाज कमी करण्याच्या तंत्रज्ञानाने भरभरून असा आहे. याशिवाय यामध्ये AI Noise Reduction देखील देण्यात आले आहे. हा हेडफोन 252 ग्रॅम वजनाचा असून, यात 2000mAh बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की, यातून 247 तासांचा प्लेबॅक टाईम मिळू शकतो.
यातील एक खास फीचर म्हणजे त्याची बॅटरी वापरात असतानाही चार्ज करता येते. या हेडफोन्सचा हेडबँड हाय पॉवर प्रतिरोधक पॉलीप्रॉपिलीनने बनलेला आहे. तसेच हा मायक्रोफोन स्क्रॅच रेजिस्टन्सही आहे.