नवी दिल्ली : सध्या अनेक नेटवर्क कंपन्यांकडून सेवा पुरवली जात आहे. ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने कंपन्यांकडून पावले उचलली जात आहे. असे असताना आता Airtel ने मोठं पाऊल उचललं आहे. त्यानुसार, एका विशिष्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने Spam SMS आणि Calls ब्लॉक केले आहेत.
Airtel ने सांगितले की, AI-पावर्ड स्पॅम-फायटिंग सोल्यूशन लाँच केल्यानंतर अडीच महिन्यांत 8 अब्ज स्पॅम कॉल आणि 0.8 अब्ज स्पॅम एसएमएस फ्लॅग केले आहेत. कंपनीने या संशयास्पद कॉल्सबद्दल सुमारे 252 दशलक्षहून अधिक ग्राहकांना अलर्ट केले आहे आणि त्यांना रिस्पॉन्स देणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत 12 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे.
एअरटेलने असेही म्हटले आहे की, नेटवर्कवरील सर्व कॉल्सपैकी 6% स्पॅम कॉल म्हणून ओळखले गेले आहेत, तर सर्व एसएमएसपैकी 2% स्पॅम म्हणून ओळखले गेले आहेत. विशेष म्हणजे, असे आढळून आले आहे की 35% स्पॅमर्सनी लँडलाईन टेलिफोनचा वापर केला आहे.
सकाळी 9 पासून होते कॉलला सुरुवात
बहुतेक स्पॅम कॉल सकाळी 9 वाजता सुरू होतात आणि हळूहळू दिवसभर वाढतात. रविवारी या कॉल्सची संख्या सुमारे 40% कमी होते. विशेषतः 15,000 ते 20,000 रुपयांच्या कॅटेगिरीतील स्मार्टफोन्सना स्पॅम कॉलपैकी सुमारे 22 टक्के कॉल येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच आता Airtel कडून कडक पावले उचलली जात आहे.