सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतोच. याशिवाय, फोनची देखील विशेष काळजी घेत असतो. कारण, जर पावसाचं पाणी फोनमध्ये गेले तर फोनवर परिणाम होऊन फोन खराब होऊ शकतो. पण, असे काही घरगुती पर्याय आहेत त्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
जर फोन ओला झाला किंवा पाण्यात पडला तर सर्वप्रथम फोन चालू असेल तर तो तातडीने बंद करा. त्यानंतर फोनचे कोणतेही बटण दाबण्याचा किंवा फोन चालू करण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे फोनमध्ये शॉर्ट सर्किटचा धोका उद्भवू शकणार नाही. जर तुमच्याकडे जुना फोन असेल ज्यामध्ये बॅटरी काढण्याची सुविधा असेल तर फोनची बॅटरी, मेमरी कार्ड आणि सिम कार्ड हळूवारपणे बाहेर काढा.
जर तुमच्या फोनमध्ये न काढता येणारी बॅटरी असेल तर शॉर्ट सर्किटचा धोका असतो. अशावेळी फोन फॅनखाली किंवा हेअर ड्रायरने (ब्लोअर) वाळवा. फोनवर दिसणारे पाणी स्वच्छ कापडाने किंवा कागदाच्या रुमालाने पुसून टाका. यातील पर्याय वापरून, खूप प्रयत्न करूनही फोन चालू होत नसेल तर उशीर न करता सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन फोन रिपेअर करून घ्यावा.