नवी दिल्ली : नवीन फोन घेतल्यानंतर पहिल्यांदा आपण त्याला स्क्रीनगार्ड आणि बॅककव्हर लावण्याचा विचार करतो. पण तुमचा हाच कव्हर तुमच्या मोबाईलसाठी नुकसानकारक ठरू शकतो. त्यामुळे काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. असे केल्यास तुम्हाला पुढील धोका टाळता येऊ शकतो.
फोनवर प्लास्टिकचा कव्हर वापरल्यास त्याने फोन सुरक्षित राहू शकतो. पण कधी-कधी फोन चार्जिंगदरम्यान कव्हरमुळे फोन खूप गरम होतो. यामुळे, डिव्हाईसच्या बॅटरीवर विपरित परिणाम होतो. फोनवर कव्हर जास्त वेळ वापरल्यास बॅटरीची क्षमता लवकर कमी होते. मोबाईलवर प्लास्टिक कव्हर ठेवल्याने फोनचे वजन वाढते, अशा परिस्थितीत काही वेळाने फोन वापरणेही अवघड होऊन जाते.
फोन कव्हर म्हणून वापरल्या जाणाऱ्या बहुतेक कव्हर्समध्ये भरपूर प्रमाणात प्लास्टिक असते. अशा परिस्थितीत, काही काळानंतर, जेव्हा त्यांची चमक किंवा डिझाईन खराब होते, तेव्हा बहुतेक लोक ते फेकून देतात. अशावेळी त्याचा पुनर्वापर करणे कठीण होऊन जाते. ज्यामुळे ते निरुपयोगी बनते. यानंतर त्याचा पुनर्वापर करणे हेही खूप अवघड होऊन जाते.