सध्या कोणताही अज्ञात रस्ता, ठिकाण शोधायचं असल्यास Google Maps चा वापर केला जातो. या अॅप्सच्या युजर्सची संख्याही वाढताना दिसत आहे. त्यानुसार, कंपनीकडूनही आपल्या युजर्ससाठी अनेक विशेष असे फिचर्स दिले जात आहेत. त्यात आता गुगलकडून इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसह अनेक गोष्टींची माहिती दिली जाणार आहे.
Google Maps ही एक सर्व्हिस आहे जी जगभरातील भौगोलिक प्रदेश आणि साईट्सबद्दल तपशीलवार माहिती देते. पारंपारिक रस्त्यांच्या Maps व्यतिरिक्त, Google Maps अनेक ठिकाणांची हवाई आणि सॅटलाईट फोटो देण्याचे कामही करते. काही शहरांमध्ये Google Maps वाहनांमधून घेतलेल्या छायाचित्रांसह रस्त्याची दृश्ये दिली जात आहेत.
गुगल मॅप्समध्ये फ्लायओव्हर कॉलआउट्स आणि कारसाठी अरुंद रस्त्यांचा वापर कमी करण्यासाठी AI बेसड् रूट यांचा समावेश आहे. गुगलने अलीकडेच एक ऑगस्टपासून डेव्हलपर्ससाठी गुगल मॅप्स प्लॅटफॉर्मची किंमत 70 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदाही अनेक ग्राहकांना होणार आहे.