नवी दिल्ली : सध्या बऱ्याचशा गोष्टी स्मार्ट होताना दिसत आहे. त्यात अनेकांच्या घरात एलईडी टीव्ही आहेत. तर काही घरात स्मार्ट टीव्ही पाहिला मिळतात. या टीव्हीमुळे चित्र स्पष्ट तर दिसतेच शिवाय विजेची बचतही होते. एलईडी टीव्हीला अनेकांची पसंती आहे. मात्र, या टीव्हीची योग्यप्रकारे काळजी घेणेही आवश्यक आहे.
एलईडी टीव्ही हा चांगला स्लिम असतो. एलईडी टीव्ही शक्यतो भिंतीवर अडकवला जातो. भिंतीवर अडकवताना मात्र तो घट्ट बसला आहे की नाही हे तपासून पाहा. घट्ट नसेल तर तो खाली पडण्याची शक्यता असते. तसेच जर तुम्ही टीव्ही साफ करणार असाल तर तो योग्यप्रकारे करणे गरजेचे आहे. टीव्ही साफ करताना कोणत्याही केमिकलचा वापर करू नये. पाण्याचाही वापर शक्यतो करू नका.
तसेच अधिक वेळ टीव्ही चालू ठेवू नका. सतत टीव्ही चालू राहिल्यास तो खराब होऊ शकतो. एलईडी टीव्हीवर साचलेली धूळ नियमित साफ करणे गरजेचे आहे. टीव्हीवर धुळीचे पुट्टे साचल्यास तो खराब होण्याची शक्यता असते. याच धुळीमुळे टीव्हीवरील चित्र अस्पष्ट दिसते. त्यामुळे साफ करताना मायक्रोफायबर कापडाचा वापर करून टीव्ही साफ करावा.