पुणे : सध्या तंत्रज्ञानाच्या युगात कोणतीही वस्तू जरी आपल्याला हवी त्यासाठी आपण इंटरनेटचा आधार घेतो. इंटरनेटवर विशिष्ट माहिती संदर्भात काही ठराविक टाईप केल्यास त्याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती मिळवता येते. पण अशा काही गोष्टी आहेत त्या इंटरनेटवर सर्च केल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.
इंटरनेटवर जणू माहितीचा साठाच उपलब्ध आहे. मात्र, आपण काही गुन्हेगारी विश्वातील माहिती शोधल्यास, ते आपल्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतं. जर आपण बॉम्ब बनवणे किंवा घरी बंदूक बनवणे यांसारख्या पद्धतीसाठी इंटरनेटवर शोध घ्यायचं ठरवलं तर ते महागात पडू शकते.
तसेच भारतातच नव्हेतर जगभरातील अनेक देशांमध्ये पॉर्न साईट्स पाहिल्या जातात. पण भारतात ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’बाबत कडक कायदे आहेत. इंटरनेटवर जर आपण ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ सर्च केल्यास त्याने आपल्यावर संकट ओढवल्याशिवाय राहणार नाही. एकतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते किंवा दुसरं म्हणजे पोर्नोग्राफी वेबसाईट्सवरही अनेक धोकादायक मालवेअर असतात, जे तुमचा स्मार्टफोन हॅक करू शकतात.
आजारपणावर औषधे शोधणे टाळा
अनेक वेळा काही लोकांना असं वाटतं की त्यांना इंटरनेटच्या मदतीने योग्य वैद्यकीय सल्ला मिळू शकतो. त्यामुळे अनेकजण आजारपणात घ्यायच्या औषधांचे नावही शोधतात. पण तुमची ही सवय तुम्हाला तुरुंगात पाठवणार नाही, पण तुम्हाला दवाखान्यात नक्कीच पाठवू शकते. त्यामुळे असे करणे थांबवणे गरजेचे बनले आहे.