नवी दिल्ली : सध्या बहुतांश जणांकडे स्मार्टफोन आहे. कंपन्यांकडूनही आपल्या ग्राहकांच्या पसंतीनुसार, स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात आपल्याला स्मार्टफोनमध्ये किती सेन्सर आहेत याची माहिती नसेल. कारण, आपला जास्तीत जास्त वापर होतो तो फिंगरप्रिंट सेन्सरचा. पण याच फिंगरप्रिंट सेन्सरसह इतरही सेन्सर आहेत. ज्याची माहिती कदाचित तुम्हाला नसेल.
स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फोन लॉक आणि अनलॉक करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या सेन्सरमुळे फोनची सुरक्षा वाढते. जर तुम्ही फोनमध्ये ऑटो ब्राईटनेस फीचर वापरला असेल, तर या तंत्रज्ञानामागे ॲम्बियंट लाईट सेन्सर काम करतो. जेव्हा-जेव्हा फोनमध्ये हे फीचर अॅक्टिव्ह केले जाते, तेव्हा फोन आसपासच्या लाईटचे अंतर मोजतो. त्यानुसार फोनमध्ये ब्राईटनेस ठेवतो.
कॅपेसिटिव्ह सेन्सर फोन ऑपरेट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटांचे मोजमाप करतो. जेव्हा-जेव्हा लोक फोन ऑपरेट करण्यासाठी फोन स्क्रीनवर बोटं ठेवतात तेव्ह कॅपेसिटिव्ह सेन्सर स्वाईप आणि क्लिकसारखी कार्ये करतो. प्रॉक्सिमिटी सेन्सरचे काम युजर्सच्या चेहऱ्याद्वारे फोन लॉक आणि अनलॉक करता येऊ शकतो.