नवी दिल्ली : प्रसिद्ध टेक्नॉलॉजी कंपनी Dell ने आपला नवा Latitude सीरिजचा 7455 हा लॅपटॉप लाँच केला आहे. यामध्ये 14-इंचाचा क्वाड-एचडी प्लस (2560×1600 पिक्सेल) IPS टचस्क्रीन अँटी-ग्लेअर डिस्प्ले असून, AI फीचर्ससह अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. युजर्सला या लॅपटॉपच्या माध्यमातून सर्वोत्तम असा आनंद घेता येऊ शकणार आहे.
या लॅपटॉपची कमाल ब्राइटनेस 400 nits आहे आणि डोळ्यांच्या संरक्षणासाठी कम्फर्ट व्ह्यू प्लस लो ब्लू लाईट सर्टिफिकेट्ससह येतो. लॅपटॉप 2 प्रोसेसरमध्ये उपलब्ध असून, Snapdragon X Elite आणि Snapdragon X Plus, Adreno 740 GPU या पर्यायांमध्ये हा लॅपटॉप उपलब्ध असेल. या लॅपटॉपमध्ये 32GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 1TB पर्यंत SSD स्टोरेज उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कंपनीचा हा लॅपटॉप CoPilot + AI फीचर्ससह येत असून, न्यूरल प्रोसेसिंग युनिट लॅपटॉपची एकूण कार्यक्षमता वाढवते. युजर्सना प्रॉम्प्टमधून AI इमेज तयार करण्यासाठी किंवा लाईव्ह कॅप्शन वापरता येणार आहे. यातील 44 भाषांच्या लिस्टमधून इंग्रजीमध्ये लाईव्ह किंवा प्री-रेकॉर्ड केलेले ऑडिओ युजर्ससाठी एक चांगला अनुभव देऊ शकतात.