नवी दिल्ली : प्रसिद्ध टेक कंपनी CrossBeats ने आपला नवा Blaze B24 Soundbar लाँच केला आहे. हा साऊंडबार अतिशय उत्कृष्ट आणि प्रीमियम लूकसह उपलब्ध आहे. यामध्ये RGB लाईट्सही देण्यात आले आहेत जे तुम्हाला अंधारात डीजे लाईट्सचा अनुभव देऊ शकेल.
एकदा डिव्हाईस पेअर केल्यानंतर, जेव्हा ते चालू कराल तेव्हा ते आपोआप पेअर होईल. यासोबत तुम्ही हा साऊंडबार AUX, USB, SD card नेही कनेक्ट करू शकता. यामध्ये FM ही लावता येऊ शकतो. यात 24W डायनॅमिक ड्रायव्हर आणि 43mm ड्युअल बेस सिस्टम असून, या साऊंडबारचे वजन 619 ग्रॅम आहे. या साऊंडबारमध्ये प्लास्टिक बॉडी असून, वरच्या बाजूला चार बटणे देण्यात आली आहेत. ज्यातून आवाज वाढवता किंवा कमी करता येऊ शकणार आहे.
तर इतर दोन बटणांपैकी एक मोड बदलण्यासाठी आणि एक ट्रॅक बदलण्यासाठी दिलेला आहे. याशिवाय, त्याच्या मागील बाजूस एक On/Off बटण आहे. त्याच्या पुढे, AUX केबल, USB-C, Type-C साठी एक पोर्ट आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही साउंडबार कनेक्ट करून टाइप-सी चार्जरने चार्जही करू शकता. Amazon वरून हा साऊंडबार 1699 रुपयांपर्यंत खरेदी करता येऊ शकणार आहे.