नवी दिल्ली : सध्या कोणतेही व्यवहार करायचे झाल्यास अनेकांकडून UPI चा वापर केला जातो. स्कॅमर अनेकदा फोन करून लकी ड्रॉ ऑफर लागल्याचे सांगतात किंवा इतर कोणत्याही माध्यमातून ऑनलाईन स्कॅम केला जातो. पण तुम्हाला UPI Scam पासून वाचता येऊ शकणार आहे. त्यासाठी फक्त काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
UPI द्वारे पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही ॲपमध्ये पिन टाकण्याची गरज भासत नाही. पण पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला ॲपमध्ये UPI पिन टाकावा लागतो. तुम्ही चुकून तुमचा UPI पिन कुणासोबत शेअर केल्यास पैसे मिळण्याऐवजी खात्यातून पैसे जाऊ शकतात. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे.
स्कॅमर अनेकदा फोन कॉल करून तुमच्या बँक खात्यात चुकून पैसे जमा झाल्याचे सांगतात. तेव्हा ती रक्कम मोठी असू शकते. अशा परिस्थितीत, जर कोणी पैसे परत पाठवण्यास सांगितले आणि काही आपत्कालीन परिस्थितीचा उल्लेख केला, तर तो एक स्कॅम असू शकतो. अशा परिस्थितीत, प्रथम तुम्हाला तुमचे बँक खाते तपासावे लागेल की त्यात पैसे आले आहेत की नाही. अनेक प्रकरणांमध्ये, स्कॅमर पैसे घेण्यासाठी खोटे एसएमएस पाठवून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकतात.
बनावट UPI ॲपपासून राहा सावध
अनेक लोक UPI साठी ॲप्स वापरतात. पण हे अॅप फेक असणार नाही, याची खबरदारी घ्या. अनेक वेळा पेमेंटसाठी बनावट QR वापरला जातो, अशा परिस्थितीत स्कॅमर तुम्हाला फोन डिस्प्लेवर व्यवहाराचा बनावट संदेश दाखवू शकतात, तर प्रत्यक्षात पैसे खात्यात येत नसतात. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे.