नवी दिल्ली : सध्या कोणतीही माहिती जाणून घ्यायची असेल तर सर्वात आधी आपण गुगलचा आधार घेत असतो. गुगलकडून मिळणारी माहिती ही अचूक असते. त्यात Google Assistant चा वापरही वाढत आहे. असे असताना आता यालाच टक्कर देण्यासाठी चॅट जीपीटी आले आहे. या चॅट जीपीटीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ChatGPT हे Google Assistant ची जागा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात सध्या अनेक एआय टूल्स आहेत. मात्र, सर्वांत लोकप्रिय आहे ते चॅट जीपीटी. चॅट जीपीटी हळूहळू Google Assistant आणि Apple Siri ची जागा घेत आहे. एका नवीन अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, Google असिस्टंट सर्व अँड्रॉईड फोन्समधून काढून टाकले जाणार आहे आणि त्याची जागा ChatGPT घेणार आहे.
ChatGPT एडिशन 1.2023.352 गेल्या महिन्यात लॉन्च करण्यात आली आहे. ज्यामध्ये नवीन ऍक्टिव्हिटीचा कोड देखील आहे ज्याचे नाव com.openai.voice.assistant.Assistan- tActivity असे आहे. सध्या ते डिफॉल्टनुसार डिसेबल केले आहे. मात्र, लाँच केल्यानंतर ते सक्षम केले जाऊ शकते. डिफॉल्ट Google असिस्टंट सर्व Android फोनमधून काढून टाकले जाईल आणि ChatGPT लाँच केले जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.