नवी दिल्ली : सध्याच्या डिजिटलच्या युगात अनेक गोष्टी स्मार्ट झाल्या आहेत. मग तो स्मार्टफोन असो किंवा स्मार्टवॉच. असे असताना आता प्रसिद्ध जपानी कंपनी Casio ने एक नवी रिंग लाँच केली आहे. ही साधीसुधी रिंग नाहीतर LCD स्क्रीन असणारी रिंग आहे. या रिंगच्या आतमध्ये एक वॉच अर्थात घड्याळ आहे. यात छोटासा डिस्प्लेही देण्यात आला आहे.
Casio च्या रिंगचं नाव आहे CRW-001-1JR. ही एक रिंग क्लासिक स्टाईलमध्ये वेळ दर्शवते. Casio चे हे वॉच सध्या जपानमध्ये उपलब्ध असेल. Casio च्या या रिंगमध्ये लहान डिस्प्लेमुळे, यात सात-सेगमेंट LCD स्क्रीन दिसत आहेत. यामध्ये यूजर्स तास, मिनिटं आणि सेकंदात वेळ पाहू शकतात. Casio च्या या रिंगमध्ये युजर्सना तीन फंक्शनल बटणे पाहायला मिळणार आहेत. हे युजर्संना वेळ आणि डेटा बदलण्याची सुविधा देते. यात स्टॉपवॉचची सुविधाही आहे.
Casio ने गेल्या वर्षी रिंग वॉचचे प्रदर्शन घेतले होते, ज्यामध्ये डिजिटल वॉच दिसून आले होते. मात्र, याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर अखेर वॉचसह येणारी रिंग मार्केटमध्ये आणली आहे. या रिंग वॉचमध्ये युजर्संना लाईट आणि अलार्मची सुविधा मिळणार आहे. यात पॉवरसाठी एकच बॅटरी देण्यात आले आहे.