नवी दिल्ली : सध्या अनेक मोबाईल नेटवर्क कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांसाठी विशेष असे प्लॅन आणले जात आहेत. त्यात सरकारी नेटवर्क कंपनी अशी ओळख असलेल्या BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी होळीपूर्वी एक नवीन ऑफर आणली आहे. ज्यांच्याकडे BSNL चे प्रीपेड सिम आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे.
बीएसएनएलच्या ग्राहकांना 2399 रुपयांमध्ये दररोज 2 जीबी डेटा आणि अमर्यादित कॉल्सची ऑफर दिली जात आहे. वैधता एक वर्षापेक्षा जास्त काळ उपलब्ध असणार आहे. होळीच्या निमित्त ही ऑफर आणण्यात आली आहे. अलीकडच्या काही महिन्यांत, कंपनीने अनेक आकर्षक प्लॅन्स आणले आहेत आणि Jio, Vi आणि Airtel सारख्या कंपन्यांचे आव्हान वाढवले आहे. BSNL ने आता असाचा प्लॅन आणला आहे.
कंपनीने 2399 रुपयांच्या BSNL रिचार्जला होळी धमाका ऑफर म्हटले आहे. या रिचार्जवर, ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा, दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉल्स मिळतात, तेही 425 दिवसांसाठी. असे जरी असले तरी हा काही नवीन प्लॅन नाही. कंपनीने व्हॅलिडिटी अर्थात वैधता 30 दिवसांसाठी वाढवली आहे.