नवी दिल्ली : ॲपलने नुकताच आपला नवीन iPad लाँच केला आहे. कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला Apple iPad Mini 7 लाँच केला, जो शक्तिशाली फीचर्ससह मिळतो. हा फोन भारतासह 29 देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Apple iPad Mini 7 मध्ये 8.3-इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे. यात Apple चा A17 Pro प्रोसेसर आहे. हा टॅबलेट Apple Pencil Pro च्या सपोर्टसह येतो. यामध्ये तुम्हाला iPad OS 18 मिळणार आहे. त्याची विक्री आजपासून म्हणजेच 23 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. हा टॅबलेट आजपासून खरेदी करता येणार आहे. त्याचा वाय-फाय व्हेरिएंट 49,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत येतो. तर सेल्युलर व्हेरिएंटची किंमत 64,900 रुपयांपासून सुरू होते. हा टॅबलेट ऑनलाईन खरेदी केल्यास मोठा फायदा होऊ शकतो.
iPad Mini 7 च्या 128 GB स्टोरेजसह हा टॅबलेट उपलब्ध आहे. हा टॅबलेट चार रंगांच्या पर्यायांमध्ये मिळत आहे. निळा आणि जांभळा या रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा टॅबलेट Apple च्या अधिकृत वेबसाईट, स्टोअर्स आणि इतर अधिकृत ऑनलाइन आणि ऑफलाइन चॅनेलवरून खरेदी केला जाऊ शकतो.