नवी दिल्ली : सध्या फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात व्हॉट्सअॅपचा युजरवर्ग प्रचंड आहे. त्यामुळेच कंपनीकडून अनेकदा नवनवीन फीचर्स आणले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे एक फीचर येत आहे. या फीचर्सच्या माध्यमातून चॅटिंगचा अनुभव बदलणार आहे.
आता नव्या फीचर्सच्या माध्यमातून युजर्सना 10 नवीन फिल्टर्स पाहायला मिळतील. यामध्ये वॉर्म, कूल, ब्लॅक अँड व्हाईट, ड्रीमी इत्यादी विविध पर्याय दिले आहेत. प्रत्येक फिल्टर वेगळा अनुभव देतो. युजर्स त्यांच्या चॅटिंगच्या मूडनुसार फिल्टर निवडू शकतात. तुम्हाला बॅकग्राऊंड पर्यायही मिळणार आहे.
तसेच WhatsApp व्हिडिओ कॉल दरम्यान तुम्हाला बॅकग्राऊंड अगदी सहज बदलता येणार आहे. त्याच्या मदतीने, तुम्हाला तुमच्या बॅकग्राऊंडला काय दाखवायचे आहे ते तुम्ही सहजपणे निवडू शकता. त्याच्या मदतीने, युजर्स त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये कॅफे किंवा बीच यांसारखी बॅकग्राऊंड दाखवू शकतील. याशिवाय यामध्ये ब्लर इफेक्टही दिसणार आहे.