नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. पण हा वापर करताना काही काळजी देखील घेणे गरजेचे असते. सध्या Scammers कडून नवीन पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
हॅकर्स लोकांनी शेअर केलेल्या फोटोंमधून फिंगरप्रिंट चोरतात. स्कॅमर लोकांच्या फिंगरप्रिंटचा क्लोन तयार करतात. यानंतर ते तयार केलेल्या फिंगरप्रिंटद्वारे लोकांची फसवणूक करतात. सायबर गुन्हेगार स्कॅम करण्यासाठी लोकांच्या सोशल मीडिया अकाउंटची मदत घेतात. ज्या लोकांनी सोशल मीडियावर चांगल्या दर्जाचे फोटो पोस्ट केले आहेत, ते त्यांच्या फोटोंवरून डाउनलोड करतात.
यानंतर, हॅकर्स चोरलेल्या फिंगरप्रिंटचे क्लोन करतात आणि नंतर लोकांची फसवणूक करतात. त्यासाठी स्कॅमर्स आधार बेस्ड् पेमेंट सिस्टिमची मदत घेतात आणि क्लोन केलेल्या फिंगरप्रिंटचा वापर करतात. यामध्ये स्कॅमर्स लोकांची बँक खातीही रिकामे करतात.
स्कॅमर्सच्या नवीन पद्धती टाळण्यासाठी, काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हा स्कॅम टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमची माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगणे.