नवी दिल्ली : प्रसिद्ध टेक कंपनी Asus इंडियाने आपले दोन नवे लेटेस्ट लॅपटॉप लाँच केले आहेत. Zenbook S 13 OLED आणि Vivobook 15 असे हे दोन लॅपटॉप आहेत. या लॅपटॉपमध्ये अनेक बेस्ट असे फिचर्स देण्यात आले आहेत. हे दोन्ही लॅपटॉप स्लिम आणि लाईट आहेत.
Zenbook S 13 OLED मध्ये 13.3 इंच 2.2K Resolution, 600 नीट्स पीक ब्राईटनेस, 85 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो, 100 टक्के डीसीआय-पी 3, डॉल्बी व्हिजन, डिस्प्लेएचडीआर 600 ट्रू ब्लॅक यांसारखी अनेक खास फीचर्स आहेत. या लॅपटॉपमध्ये Intel Core Ultra 7 155U चा प्रोसेसर देण्यात आला असून, हा लॅपटॉप Windows 11 Home वर चालतो. या लॅपटॉपमध्ये 63Wh लिथियम-पॉलिमर बॅटरी आणि 65W टाईप-सी पॉवर ॲडॉप्टर आहे.
तसेच Vivobook 15 या लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये 15.6 इंच एफएचडी Resolution, 250 नीटस पीक ब्राइटनेस, 60 एचझेड रिफ्रेश रेट, आयपीएस पॅनेल यांसारखे अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच हा लॅपटॉप Windows 11 Home वर Intel Core Ultra 5 120U आणि Intel Core 3 100U वर चालतो. त्यामध्ये ग्राफिक्ससाठी इंटेल इंटिग्रेटेड ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे. यासह इतर अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.