नवी दिल्ली : सध्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्यात आता प्रसिद्ध कंपनी Asus ने आपला Chromebook CM14 लाँच केला आहे. यामध्ये 8 GB रॅम देण्यात आला असून, 128 GB चा इंटरनल स्टोरेज असणार आहे.
Asus कंपनीने त्यांचा पहिला मीडिया टेक कॉम्पॅनिओ 520 प्रोसेसर पॉवर्ड Chromebook CM14 लॅपटॉप लाँच केला आहे. या लॅपटॉपची किंमत 26,990 रुपये असून, यामध्ये अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. हा 14 इंचांचा 1080 पी डिस्प्ले असणारा कॉम्पॅक्ट क्रोमबुक लॅपटॉप असणार आहे. Chromebook CM14 मध्ये 8 GB रॅम, 128 GB इंटरनल स्टोरेज आणि मीडिया टेक Kompanio 520 असणार आहे.
तसेच यामध्ये एक मायक्रो एसडी कार्ड आणि 12 महिन्यांसाठी 100 जीबी क्लाउड स्टोरेजसह ‘गूगल वन’चे सबस्क्रिप्शन देण्यात येणार आहे. ऑक्टा-कोर सीपीयू क्लस्टरसह खास डिझाईन केलेला प्रोसेसर आहे. त्यामध्ये प्रोसेसर वाय-फाय 6 आणि ब्ल्यूटूथ 5.3 सारखे नवीन वायरलेस फिचर्स देण्यात आले आहेत.