नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स आणले जात आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांचा कलही वाढला आहे. त्यात आता बहुतांश स्मार्टफोनमध्ये टाईप-C चार्जर पॉईंट दिला जात आहे. तुमच्याही स्मार्टफोनमध्ये टाईप-C चार्जर पॉईंट दिला असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे.
कंपन्याकडून स्मार्टफोनमध्ये टाईप-C चार्जरसह हाय-वॅट चार्जर दिला जात आहे. पण एका चुकीमुळे फोनची क्षमता कमी होत आहे. बरेच लोक टाईप-C चार्जर साफ करत नाहीत. अशा परिस्थितीत चार्जरमधील धूळ टाईप-C पोर्टमध्ये जाते आणि परिणामी फोनची Life कमी होते. ही स्थिती दीर्घकाळ चालू राहिल्यास फोन पाच वर्षांच्या ऐवजी कमी वेळात खराब होऊ शकतो.
यासोबतच अनेकांना त्यांचा चार्जर किती वॅट्सचा आहे हे माहीत नसते. अशावेळी योग्य माहिती नसल्यामुळे, बहुतेक लोक कोणत्याही चार्जरने फोन चार्ज करतात. याशिवाय अनेकवेळा लोक सार्वजनिक ठिकाणीही आपला फोन चार्ज करतात, त्यामुळे फोनच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी घेण्याचे महत्त्वाचे आहे.