नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात आता फ्लिप फोनची क्रेझ झपाट्याने वाढली आहे. यावर्षी सॅमसंगने आपला नवीन फ्लिप फोन Galaxy Z Flip 6 लाँच केला आहे. Infinix चा फ्लिप फोन देखील याच महिन्यात मार्केटमध्ये येत आहे.
जर Samsung Galaxy Z Flip 6 हा फोन तुमच्या बजेटच्या बाहेर असेल तर मोटोरोचा रेझर 40 हा एक बेस्ट फ्लिप फोन आहे. या Motorola फोनची किंमत Flipkart वर 44,999 रुपये आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.9 इंचाचा फ्लेक्स व्ह्यू फुल एचडी+ डिस्प्ले मिळणार आहे. हा डिस्प्ले 144Hz च्या रीफ्रेश आणि 1400 nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह येतो.
Oppo Find N3 हा एक फ्लिप फोन असून, बेस्ट असा ठरत आहे. 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेला हा फ्लिप फोन Amazon India वर 64,999 रुपयांना उपलब्ध आहे. Oppo च्या या फोनमध्ये तुम्हाला 1080×2520 पिक्सेल रिझोल्युशनसह 6.8 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
यामध्ये 50MP चा Primary Camera आणि 48MP चा अल्ट्रावाईड अँगल सेन्सर आणि 32MP चा टेलिफोटो सेन्सर देण्यात आला. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 32 MP कॅमेरा असणार आहे.