नवी दिल्ली : स्मार्टफोनमध्ये मिळणाऱ्या फीचर्समुळे अनेकांचा कल आता बेसिक फोनवरून स्मार्टफोनकडे वळला आहे. त्यानुसार, अनेक कंपन्यांकडून स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. पण, स्मार्टफोन घेताना काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
तुम्ही घेत असलेल्या स्मार्टफोनची कॅमेरा क्लालिटी एकदा तपासून पाहा. कारण, आजकाल कॅमेरा हा खूप महत्त्वाचा झाला आहे. तुम्हाला फोटोग्राफी आवडत असल्यास, कॅमेरा क्लालिटी, लेन्स आणि मेगापिक्सेलकडे लक्ष द्या. मल्टिपल कॅमेरा सेटअप (वाइड-एंगल, मॅक्रो, टेलिफोटो) हा देखील चांगला पर्याय असू शकतो.
तसेच प्रोसेसर फोनचा वेग आणि मल्टीटास्किंग क्षमता ठरवतो. तुम्ही गेमिंग किंवा हेवी ॲप्लिकेशन्स वापरत असाल तर तुम्ही हाय-एंड प्रोसेसर असलेला फोन निवडावा. फोन खरेदी करताना बॅटरी क्षमता आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळत आहे की नाही हे पाहा. जर तुम्ही दिवसभर फोन वापरत असाल, तर किमान 4000mAh क्षमतेचा फोन निवडा.
याशिवाय, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या फोनचा स्टोरेज. तुम्ही कमीत कमी 6 GB RAM आणि 128 GB स्टोरेज असलेला फोन विकत घ्यावा. कारण त्याचा तुमच्या फोनच्या परफॉर्मन्स आणि डेटा स्टोरेज क्षमतेवर परिणाम होतो. सर्वाधिक स्टोरेज असल्यास त्याचा परफॉर्मन्सवर फरक दिसून येतो. त्यामुळे चांगला स्टोरेज असलेला स्मार्टफोन तुम्ही घ्यावा.