Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“राज्य पुरस्कृत हल्लेखोर तुमचा फोन हॅक…”, अ‍ॅपलकडून इंडिया आघाडीतील नेत्यांना इशारा!

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 31 October 2023, 17:32
Apple warns Opposition MPs about ‘state-sponsored’ attacks on their iPhones

नवी दिल्ली: इंडिया आघाडीतील काही प्रमुख नेत्यांचे फोन केंद्र सरकार हॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याचे इशारावजा संदेश अ‍ॅपल कंपनीकडून या नेत्यांना पाठवण्यात आले आहेत. “कदाचित राज्य पुरस्कृत हल्लेखोर तुमचे आयफोन हॅक करण्याच्या प्रयत्नात आहेत. तुम्ही जे आहात किंवा तुम्ही जे काही करत आहात, त्यामुळे हे हल्लेखोर तुमचे फोन हॅक करण्याची शक्यता आहे”, असे मेसेज या नेत्यांना पाठवण्यात आले आहेत. यामध्ये सध्या चर्चेत असणाऱ्या टीएमसी महुआ मोईत्रा, काँग्रेस खासदार शशी थरूर, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी आदींचा समावेश आहे. या नेत्यांनी आपल्या एक्सवर (ट्विटर) यासंदर्भातले स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर सध्या ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात आरोप होत आहेत. या मुद्द्यावरून वातावरण चांगलचं तापलेलं असतानाच खासदार महुआ मोईत्रांनी मंगळवारी सकाळी अ‍ॅपलकडून आलेला इशारा देणारा संदेश पोस्ट केला. महुआ मोईत्रा या आयफोन वापरत असून सरकार पुरस्कृत हॅकर्सकडून आयफोन हॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा हा इशारा होता. असाच संदेश काँग्रेस खासदार शशी थरूर, पवन खेरा, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि सीताराम येचुरी यांनाही आले आहेत.

Opposition leaders TMC’s Mahua Moitra, Shiv Sena’s (UBT) Priyanka Chaturvedi and Congress leaders Shashi Tharoor and Pawan Khera say they have received warnings from their phone manufacturer about “state-sponsored attackers trying to compromise their phone” pic.twitter.com/ecQcIenHOT

— ANI (@ANI) October 31, 2023

काय आहे या संदेशात?

खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये हा मेसेज सविस्तर दिल्याचं दिसत आहे. “अ‍ॅलर्ट – सरकार पुरस्कृत हल्लेखोर कदाचित तुमचा फोन हॅक करत आहेत. आम्हाला अशी शक्यता वाटत आहे. आम्हाला वाटतंय की तुमच्या अ‍ॅपल आयडीशी संलग्न आयफोन त्रयस्थ ठिकाणी बसून हॅक करण्याचे प्रयत्न सरकारकडून मदत मिळणारे हॅकर्स करत आहेत. तुम्ही जे आहात किंवा तुम्ही जे करता, त्यामुळे तुमचे फोन हॅक करण्याचे प्रयत्न होत आहेत. जर हे हल्लेखोर यशस्वी झाले, तर ते कुठेही बसून तुमच्या फोनमधील संवेदनशील माहिती, संदेश किंवा अगदी कॅमेरा आणि मायक्रोफोनशीही छेडछाड करू शकतात. अर्थात, हेही शक्य आहे की हा अ‍ॅलर्ट चुकीचा असेल. पण तो गांभीर्यानं घ्यावा अशी तुम्हाला विनंती आहे”, अंसं या संदेशात नमूद करण्यात आलं आहे.

 

Received text & email from Apple warning me Govt trying to hack into my phone & email. @HMOIndia – get a life. Adani & PMO bullies – your fear makes me pity you. @priyankac19 – you, I , & 3 other INDIAns have got it so far . pic.twitter.com/2dPgv14xC0

— Mahua Moitra (@MahuaMoitra) October 31, 2023

 

इंडिया आघाडीच्या नेत्यांवर सायबर हल्ले?

दरम्यान, खासदार महुआ मोईत्रांनी अशा प्रकारचे संदेश आलेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांची यादी एक्सवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांच्याव्यतिरिक्त समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, राघव चड्ढा, शशी थरूर, प्रियांका चतुर्वेदी, सीताराम येचुरी, पवन खेरा व राहुल गांधींच्या कार्यालयातील इतर नेत्यांचा समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “हा सर्व प्रकार आणीबाणीपेक्षाही वाईट आहे”, असं मोईत्रा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47
Next Post

Indapur News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इंदापुरात कडकडीत बंद, नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.