नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Apple च्या iPhone ला चांगली पसंती मिळत आहे. त्यातच आता Apple कंपनीकडून भारतात एक नव्हेतर चार स्टोअर्स सुरु केले जाणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत ‘मेड इन इंडिया’ iPhone 16 Pro ची विक्री केली जाणार आहे.
भारतात पुणे, बंगळुरू, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई येथे आणखी चार स्टोअर्स सुरु केले जाणार आहेत. कंपनीने हे देखील जाहीर केले की, या महिन्यात ते त्यांचे पहिले ‘मेड इन इंडिया’ iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max सीरिज डिव्हाइसेस लाँच करणार आहे. या Apple चे मुंबई आणि दिल्ली येथे आधीच स्टोअर उपलब्ध आहेत. हे ॲपल स्टोअर्स पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे.
आता भारतात iPhone 16 सीरीजमधील स्मार्टफोनची निर्मिती केली जाणार आहे. Apple कडून सांगण्यात आले की, Apple आता संपूर्ण iPhone 16 लाईनअप भारतात तयार करत आहे, ज्यात iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max यांचा समावेश आहे. मेड-इन-इंडिया iPhone 16 Pro आणि Pro Max चा सप्लाय या महिन्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे.