पुणे प्राईम न्यूज डेस्क: ज्यांना नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट, किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स खरेदी करायचे आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी Amazon ने Prime Day 2025 सेलची घोषणा केली आहे. ही सेल 12 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार असून 14 जुलै रोजी रात्री 11:59 वाजता संपणार आहे.

तीन दिवस चालणारी ही सेल केवळ Amazon Prime मेंबर्ससाठी उपलब्ध असणार आहे. ग्राहकांनी जर प्राईम सब्स्क्रिप्शन घेतले असेल, तर त्यांना सेलमधील आकर्षक डील्सचा फायदा मिळू शकेल.
या प्रोडक्ट्सवर मिळणार जबरदस्त ऑफर्स
Amazon ने या सेलदरम्यान अनेक प्रसिद्ध ब्रँड्सच्या प्रोडक्ट्सवर सवलती जाहीर केल्या आहेत. त्यात पुढील वस्तूंचा समावेश आहे.
Samsung Galaxy S24 Ultra : मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध
OnePlus 13s आणि iQOO Neo 10 : खास ऑफर्समध्ये
Sony WH-1000XM5 हेडफोन्स आणि Samsung Galaxy Buds 3 Pro : कमी किमतीत Asus Vivobook लॅपटॉप , Samsung Galaxy Tab S9 FE, आणि HP व Samsung चे टॅबलेट्स आणि लॅपटॉप्सवर आकर्षक सवलत
बँक ऑफर्ससह अतिरिक्त 10% सूट
ग्राहक SBI आणि ICICI बँक कार्डांचा वापर करून १०% पर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळवू शकतील. यासोबतच काही निवडक प्रोडक्ट्सवर अतिरिक्त सूटही लागू केली जाईल.
Prime Day 2025 सेल Amazon च्या ग्राहकांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. तुम्ही जर नवीन तंत्रज्ञान खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या या सेलसाठी नक्की तयार राहा!







