नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात WhatsApp, Facebook आणि Instagram याच्या युजर्सची संख्या तर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यानुसार या कंपन्यांकडून आपल्या युजर्ससाठी नवनवे फिचर्स दिले जात आहे. असे असताना आता मेटा इन्स्टाग्राममध्येही एक भन्नाट फिचर येत आहे.
इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही त्याचा इन्स्टाग्रामवरील मेसेज वाचला आहे की नाही हे आता कळू शकणार नाही. यापूर्वी अशाप्रकारचं फिचर WhatsApp वर पाहिला मिळत होतं. त्यानंतर आता इन्स्टाग्रामवरही हे फिचर पाहिला मिळणार आहे. या नव्या फिचरचे नाव ‘रीड रिसीट’ असं आहे. इन्स्टाग्रामवर हे फिचर लवकरच सुरू केले जाणार आहे. हे फीचर इन्स्टाग्राम युजर्सना आलेल्या डायरेक्ट मेसेजवर काम करणार आहे.
‘Read Receipt’ मेसेजद्वारे, Instagram युजर्सना पाठवलेले मेसेज कोणालाही न कळवता वाचण्याची परवानगी दिली जाणार आहे. हे फीचर व्हॉट्सअॅपवर आधीपासूनच आहे. यामध्ये व्हॉट्सअॅपचे ‘रीड रिसीप्ट’ फीचर अॅक्टिव्हेट झाल्यावर मेसेज वाचूनही ब्लू टिक दिसत नाही. याबाबत कंपनीकडून सांगण्यात आले की, ‘कंपनी एका नवीन फिचरची टेस्ट करत आहे. यामुळे युजर्सना त्यांच्या थेट मेसेजमध्ये ‘रीड रिसिप्ट’ पर्याय बंद करता येणार आहे’.