नवी दिल्ली : गुगल आपल्या युजर्ससाठी अनेक सुविधा पुरवते. यामध्ये Google Photos ची सेवा देखील आहे. जर तुम्ही ही सेवा वापरत असाल तर तुम्हाला यात एक भन्नाट असे फीचर मिळणार आहे. आता तुम्हाला Google Photos च्या माध्यमातून अल्बम कोणाशीही शेअर करता येणार आहे.
Google Photos चे हे फीचर अशा युजरसाठी खूप फायदेशीर आहे ज्यांना कोणत्याही प्रोजेक्टसाठी किंवा इतर कामासाठी त्यांचे कुटुंब आणि मित्रांसोबत फोटो शेअर करायचे आहेत. तुम्ही Google Photos मध्ये शेअर अल्बम तयार करण्यासाठी कोणालाही इनव्हिटेशन पाठवू शकता.
शेअर केलेला अल्बम कोण पाहू शकतो, तो कोण एडिट करू शकतो आणि कोण डिलिट करू शकतो हे देखील तुम्ही ठरवू शकता. यात इनव्हिटेशन पाठवणारी व्यक्ती शेअर केलेल्या Google Album चे कंट्रोल इतरांसोबत शेअर करता येणार आहे.
असा करता येईल वापर…
– सर्वप्रथम, तुमच्या डिव्हाईसमध्ये Google Photos ॲप उघडा किंवा Google Photos च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर तुम्ही स्क्रीनवर जाल, त्यानंतर तुमच्या प्रोफाईलवर टॅप करा. यानंतर मेनू उघडेल.
हे केल्यानंतर, शेअर अल्बम पर्याय निवडा आणि येथून तुम्ही शेअर अल्बम तयार आणि Edit करू शकता.
– यानंतर, नवीन अल्बम तयार करण्यासाठी प्लस बटणावर क्लिक करा. पुढील स्टेपमध्ये तुम्हाला अल्बममध्ये टाकायचे असलेले फोटो निवडा. अशाप्रकारे तुम्हाला फीचर वापरता येणार आहे.