नवी दिल्ली : सध्या मार्केटमध्ये अनेक गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्यात अमेझॉन कंपनीचा Alexa Echo Spot चांगल्याच पसंतीस उतरला आहे. त्यामुळे कंपनीने आता Alexa Echo Spot मध्ये Smart Display सह इतर अनेक फिचर्स दिले आहेत.
Alexa Echo Spot मध्ये छोटा स्मार्ट डिस्प्ले असून, हा विशेषतः नाईटस्टँड किंवा डेस्कसाठी डिझाईन केला आहे. याच्या मध्यभागी 2.83 इंच टचस्क्रीन देण्यात आला असून, जे अर्धे डिव्हाईस कव्हर करते. यामध्ये वेळ आणि तारीख पाहिला मिळत आहे. युजर त्यांचा डिस्प्ले अनुभव घड्याळ्याच्या फेससह बदलू शकतात. याशिवाय, कंपनीने अलार्म, म्युझिक प्लेबॅक आणि हवामानाचा अंदाज यासारख्या अनेक कामांसाठी विशेष व्हिज्युअल दिले आहेत.
याच्या डिस्प्लेच्या खाली एक 1.73 इंच फ्रंट फायरिंग स्पीकर आहे जो ग्रिलच्या आत असून, यात इनबिल्ट मायक्रोफोन आहे. याच्या माध्यमातून युजर्सना व्हॉईस कमांडद्वारे अलेक्साशी संवाद साधण्याची परवानगी देतो. यात मायक्रोफोन म्यूट बटण आहे जे डिव्हाईसच्या व्हॉल्यूम अप आणि डाऊन बटणांच्या दरम्यान सोयीस्करपणे ठेवले आहे.