नवी दिल्ली : सध्या अनेक कंपन्यांकडून मोबाईल सर्व्हिस दिली जात आहे. त्यात Jio, Airtel, Vi आणि BSNL या आघाडीच्या कंपन्या आहेत. या कंपन्यांचे रिचार्ज पॅकही थोड्याफार फरकाने सारखेच आहेत. असे जरी असले तरी हे पॅक्स परवडणाऱ्या दरात नसल्याचे अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता Airtel ने सर्वात स्वस्त फॅमिली प्लॅन लाँच केला आहे.
Airtel कंपनीकडून Postpaid आणि Prepaid अशा दोन्ही सेवा देते. जर तुम्ही Postpaid युजर्स असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना त्याच रिचार्जमध्ये जोडू शकता. कंपनी वेगवेगळ्या फॅमिली प्लॅन ऑफर करत आहे. असाच एक प्लॅन 699 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही दोन लोकांचे कनेक्शन वापरू शकता. कंपनीचा हा सर्वात स्वस्त फॅमिली रिचार्ज प्लॅन आहे. तुम्ही 699 रुपयांच्या रिचार्जमध्ये मोफत कनेक्शन जोडू शकता. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. तुम्ही Local आणि STD दोन्ही कॉल करू शकता.
यामध्ये तुम्हाला 105GB मासिक डेटा मिळेल. तर प्रायमरी युजर्सला 75 GB डेटा मिळेल आणि सेकंडरी युजर्सला 30 GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनसह कंपनी डेटा रोलओव्हर सुविधाही देत आहे. म्हणजे उरलेला डेटा तुम्ही नंतर वापरू शकता. या प्लॅनचा फायदाही अनेक युजर्सला होणार आहे.