पुणे प्राईम न्यूज डेस्क: हयात नसतानाही दर महिन्याला लाखो रुपये कमावणारे कोणीतरी आहे, असे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की, असे कोणी आहे की ज्याचे अस्तित्वच या जगात नाही. तसेच कोणीही त्याला स्पर्श करू शकत नाही आणि अनुभवू शकत नाही. तरीही तो दरमहा 9 लाख रुपये कमवत असेल, तर तुम्हाला धक्का बसेल. परंतु हे खरं आहे. आम्ही येथे AI मॉडेल्सबद्दल बोलत आहोत. असे एक AI मॉडेल आहे, जे दरमहा 9 लाख रुपये कमवत आहे. चला जाणून घेऊया या AI Model ची कहाणी…
एटाना लोपेझ असे या एआय मॉडेलचे नाव
बार्सिलोनाच्या द क्लुलेसने हे एआय मॉडेल तयार केले आहे. ही बार्सिलोनाची एक प्रसिद्ध स्पॅनिश मॉडेलिंग एजन्सी आहे. या एजन्सीने एटाना लोपेझ नावाचे एआय मॉडेल लाँच केले आहे. ज्यामुळे उद्योगात खळबळ उडाली आहे. हे मॉडेल रुबेन क्रुझ यांनी तयार केले आहे. युरोन्यूजच्या रिपोर्टनुसार, एटाना लोपेझ नावाचे हे एआय मॉडेल दरमहा 10,000 युरो म्हणजेच सुमारे 9,13,180 रुपये कमवत आहे.
एटाना लोपेझचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर १,४३,००० फॉलोअर्स आहेत. एजन्सीचे म्हणणे आहे की, ती सेलिब्रेटी लोकांच्या नखऱ्यांना कंटाळली होती, त्यानंतर एजन्सीला एआयची मदत घ्यावी लागली. हे तयार करणाऱ्या क्रूझ म्हणतात की, अहंकाराने भरलेल्या किंवा पैशासाठी आतुर असलेल्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवणे हे आमचे ध्येय आहे.
सध्या एटानाच्या इंस्टाग्राम फीडमध्ये 56 फोटो आहेत. या फोटोंमध्ये कॉकटेल पार्टी, जिम इत्यादी फोटोंचा समावेश आहे. एका रिपोर्टनुसार, मार्केटमध्ये अशा AI मॉडेल्सची मागणी वेगाने वाढत आहे. एटानाप्रमाणेच एमिली पेलेग्रिनी आहे, ज्याचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लाखो फॉलोअर्स आहेत.