नवी दिल्ली: मेटाचे फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्याने जगभरातील युजर्स त्रस्त आहेत. आता बरेच वापरकर्ते YouTube देखील बंद झाल्याची तक्रार करत आहेत. तथापि, बहुतेक वापरकर्त्यांना या समस्येचा सामना करावा लागत नाही. परंतु, काही वापरकर्ते YouTube ऍक्सेस करण्यास सक्षम नाहीत.
त्यांना यूट्यूब व्हिडिओ प्ले करण्यात अडचण येत आहे. हा त्रासही रात्री नऊच्या सुमारास सुरू झाला. Downdetector.com नेही याबाबत वृत्त दिले आहे. डाउन डिटेक्टरच्या मते रात्री 9 वाजल्यापासून अनेक युजर्स यूट्यूबवर व्हिडिओ प्ले करू शकत नाहीत.
फेसबुक आणि इंस्टाग्रामही सुमारे तासभर डाऊन
मेटाचे फेसबुकही सुमारे तासभर डाऊन होते. फेसबुकशिवाय यूजर्स इंस्टाग्रामवरही प्रवेश करू शकत नाहीत. इन्स्टा फीड रिफ्रेश करण्यात समस्या येत आहे. लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग साइट यूट्यूब डाऊन झाल्यामुळे आता युजर्सना दुहेरी झटका बसला आहे.