नवी दिल्ली : सध्या YouTube चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. YouTube च्या माध्यमातून केवळ मनोरंजन क्षेत्रातील व्हिडिओ नाहीतर सर्वच स्तरावरचे व्हिडिओ पाहता येतात. त्यामुळे अनेक युजर्सने स्वत:चे YouTube चॅनेल सुरु केले आहेत. पण, तुम्हाला तुमचे YouTube चॅनेल हॅक होण्याची भीती वाटत असेल तर काळजी करू नका. Google चे नवीन AI टूल बचाव करेल.
YouTube च्या AI टूलचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला YouTube Help Center वर जावे लागेल. त्यानंतर कोणत्याही चॅनेलच्या निर्मात्याला या सुविधेचा लाभ घेता येईल. YouTube चे AI टूल अशाप्रकारे डिझाईन केले गेले आहे की निर्मात्यांना त्यांचा इंटरफेस सहज समजू शकेल. यासाठी एआय टूल युजर्सना मार्गदर्शन देखील करते, जेणेकरून एआय टूलचे फायदे सहज घेता येतील.
Google चे हे AI टूल युजर्सचे Google अकाउंट सुरक्षित करते. हॅकर्सनी चॅनलच्या नावात कोणताही बदल करू नये आणि टूलमध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड केली जाऊ नये, यासाठी एक पर्याय देखील आहे. YouTube AI बेस्ड हे टूल सध्या इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. हे टूल इतर अनेक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.