नवी दिल्ली : सध्या विविध कंपन्यांकडून स्मार्टफोन लाँच केला जात आहे. त्यात आता तैवानमधील एसर ही कंपनी लॅपटॉपच्या विश्वात एक प्रसिद्ध असे नाव आहे. कंपनीकडून भारतीय बाजारात एसर सुपर झेड एक्स आणि सुपर झेड-एक्स प्रो फोन लाँच केले जात आहेत. एसर सुपर झेड-एक्सची सुरुवातीची किंमत 9990 रुपये ठेवण्यात आली आहे.
एसर सुपर झेडएक्स आणि सुपर झेडएक्स प्रो हे दोन स्मार्टफोन बेस्ट असे ठरत आहे. एसर सुपर झेड-एक्सची किंमत 9990 रुपयांपासून सुरू होते, तर एसर सुपर झेड-एक्स प्रोची सुरुवातीची किंमत 17990 रुपये आहे. हा फोन 25 एप्रिलपासून ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. या फोन्ससोबत कोणत्याही ऑफर्सची सध्या कोणतीही माहिती नाही. एसर सुपर झेड-एक्समध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.8 इंचाचा एफएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट 240 हर्ट्झ असणार आहे. या फोनमध्ये मीडियाटेकचा डायमेन्सिटी 6300 चिपसेट आहे, जो त्याला 5G डिव्हाइस बनवतो.
एसर फोनच्या या किमतीत मोठा फोन आहे, ज्यामध्ये 64 मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा आहे. यासोबतच 2 मेगापिक्सेल डेप्थ आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असून, 5000 MAh ची बॅटरी देण्यात आली आहे.