नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Acer ने आपला नवा बेस्ट फीचर्स असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. Acer Chromebook Plus 14आणि Acer Chromebook Plus 15 हे दोन लॅपटॉप लाँच केले आहेत. या लॅपटॉपमध्ये Google Gemini AI सह अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.
Acer च्या Chromebook Plus 14 या लॅपटॉपमध्ये 14 इंचाचा फुल HD IPS डिस्प्ले आहे. तर Acer Chromebook Plus 15 यामध्ये 15.6 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये AI फीचर असल्याने गुगल फोटो मॅजिक इरेझर, फाईल सिंक, वॉलपेपर जनरेशन, एआय क्रिएडेट व्हिडिओ बॅकग्राउंड आणि अॅडोब फोटोशॉप असणार आहे. सर्व मॉडेल 16GB LPDDR5X SDRAM आणि 512GB स्टोरेज PCIe NVMe SSD पर्यंत सपोर्ट करतो.
या Chromebook Plus मध्ये ड्युअल डीटीएस स्पीकर, बास यांचा समावेश आहे. यामध्ये दोन इन-बिल्ट मायक्रोफोन आणि हाय-डेफिनिशन फुल एचडी वेबकॅमही देण्यात आला आहे. ज्यामध्ये टेम्पोरल नॉईज रिडक्शन, हाय डायनॅमिक रेंज (HDR) आणि 60fps वर 1080p व्हिडिओसाठी सपोर्ट आहे. Chromebook Plus 14 हा टॅब 47,490 रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे.