नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी iQOO चा नवा स्मार्टफोन iQOO 13 भारतात लाँच केला जाणार आहे. भारतात हा स्मार्टफोन कधी लाँच होणार याची अधिकृतपणे घोषणाच करण्यात आली आहे. भारतात पुढील फ्लॅगशिप हँडसेट आणला जाणार आहे. भारतात हा स्मार्टफोन 3 डिसेंबर 2024 रोजी लाँच केला जाणार आहे.
या कंपनीने X प्लॅटफॉर्मवर याबाबतची ही माहिती शेअर केली आहे. हा स्मार्टफोन याआधीच चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. याबाबत Amazon India ने एक मायक्रोसाईट देखील तयार केली आहे, जिथे या स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती मिळवता येऊ शकणार आहे. iQOO 13 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX921 सेन्सर आहे.
तसेच या स्मार्टफोनमध्ये Samsung S5KJN1 ची 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. त्यातील तिसरा कॅमेरा लेन्स 50MP Sony IMX816 टेलिफोटो आहे. यात 32MP कॅमेराही देण्यात आला आहे. iQOO 13 चीनमध्ये यापूर्वीच लाँच करण्यात आला आहे.
ज्यामध्ये 6.82-इंचाचा डिस्प्लेही देण्यात आला आहे. यामध्ये 144Hz चा रिफ्रेश रेट दिसेल. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट वापरण्यात आला आहे. यात इनहाऊस Q2 गेमिंग चिप देखील असणार आहे.