लहू चव्हाण
( Womne’s day 2023 ) पाचगणी : महिलांनी चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर येऊन, कुटुंब आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने सक्षम होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे असे प्रतिपादन रचना सारंग पाटील यांनी केले. भिलार येथील हनुमान मंदिर सभागृहात तेजस्विनी भिलारे, सीमा भिलारे यांच्या वतीने महिला दिनानिमित्त (Womne’s day) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सौ.पाटील बोलत होत्या.
यावेळी उत्कर्ष पतसंस्थेच्या संचालिका प्रीती कोल्हापुरे,ओम शांती सदस्या सुषमा दीदी ,ग्रामपंचायत सदस्या मंगला भिलारे, वैशाली कांबळे ,सुप्रिया आब्राळे, राकेश कांबळे,विशाल कांबळे,सुलाबाई भिलारे, सीमा भिलारे, तेजस्विनी भिलारे, सुजाता भिलारे, भारती भिलारे, सुवर्णा रांजणे सुलाबाई भिलारे ,नंदा भिलारे, हर्षदा मालुसरे,भारती भिलारे,लक्ष्मी वाडकर ,कल्पना धनावडे ,मीना भिलारे प्रभावती चौधरी,वैशाली सोनावणे,दिपाली ओबंळे आदी मान्यवर उपस्थित होते.
एक महिला शिकली तर सासर आणि माहेर दोन्ही कुटुंब स्वावलंबी आणि साक्षर होते…
यावेळी बोलताना तेजस्विनी भिलारे म्हणाल्या, एक महिला शिकली तर सासर आणि माहेर दोन्ही कुटुंब स्वावलंबी आणि साक्षर होते या उद्देशाने स्व.बाळासाहेब भिलारे दादा यांनी शाळेची स्थापना केली .त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवत स्त्री शिक्षण आणि स्वावलंबन या करिता आपण प्रयत्नशील राहणार आहे.
यावेळी समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर महिला, नर्सेस,आशा स्वयंसेवीका, अंगणवाडी सेविका, मदतनीस अशा सुमारे शंभर महिलांचा गौरवचिन्हें देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित महिलांनी नृत्य, गायनात सहभाग घेऊन महिलादिन साजरा केला. या कार्यक्रमाला महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव, तापोळा, दुर्गम भागातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. तेजस्विनी भिलारे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर आभार सीमा भिलारे यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
पाचगणी नगरपालिकामार्फत आयुष्यमान भारतचे “गोल्डन कार्ड” साठी विशेष मोहीम
पाचगणी रस्त्यावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाच्या चार चाकी बर्निंग कारचा थरार..