ओमकार भोरडे
शिरूर : शिरूरमध्ये चाकूचा धाक दाखवत महिलेकडील सव्वा तोळे सोन्याचे ९१ हजार रु. किमंतीचे दागिने चोरट्यानी लंपास केले आहेत .याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुलोचना दुधाराम राठोड (वय ४० वर्षे व्यवसाय मजुरी रा. उत्तरवाडोना, ता. नेर जि. यवतमाळ) यांनी दोन अनोळखी इसमा विरोधात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ३ एप्रिल २०२५ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास पुणे अहिल्यानगर रस्त्यावर शिरुरजवळील बो-हाडे मळा येथील कल्याणी हॉटेलसमोर अहिल्यानगर पुणे रोडच्या बाजूला सुलोचना राठौड यांचा चुलत भाऊ यास झोप लागल्याने त्यांनीं त्यांची चार चाकी गाडी( क्र. एम. एच. ३७ ए.डी.८९०७) थांबवली. ते गाडीमध्ये झोपलेले असताना दोन अनोळखी इसमांनी आवाज देऊन गाडीचा दरवाजा उघडण्यास सांगितला व त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवून राठोड यांच्या गळ्यामधील सोन्याचे मणी मंगळसूत्र व गंठण जबरदस्तीने हिसकावून घेतले व भीतीने राठौड यांनी कानातील रिंगाही काढून दिल्या.
यासंदर्भात पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नकाते तपास करीत आहे.