अजित जगताप
Satara News : सातारा : महाराष्ट्रात पूर्वीे बेकायदेशीर हातभट्टी व मटका यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत होती. अलीकडच्या वीस वर्षात बेकायदा वाळूने हॅट्रिक केली असून ग्रामीण भागातील व्हाईट कॉलर वाळू माफिया स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजू लागलेले आहेत. अशा काही वाळूमाफियांचे वाळूच्या नवीन धोरणामुळे कंबरडे मोडणार असून ते चिंताग्रस्त झाले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाचे सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे.
महसूल व पोलीस यंत्रणा हतबल झाली होती
राज्यातील नदी- नाले- ओढे या ठिकाणी वाळू माफीयांनी थैमान घातले होते. आर्थिक ताकद निर्माण झाल्यामुळे दमदाटी, खंडणी, मारहाण, खून, शासकीय कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन घालणे. असे प्रकार घडू लागले होते. त्याला काही सत्ताधाऱ्यांची साथ लाभल्यामुळे महसूल व पोलीस यंत्रणा हतबल झाली होती. तर काहींनी आपले हात चांगलेच ओले केले होते. वाळूचे कण रगडता चलन मिळे. अशा पद्धतीने ग्रामीण भागात गौण खनिज हा विभाग चांगलाच चर्चेत आला होता.
तालुकास्तरावर तहसील कार्यालयात गौण खनिज विभागात नेमणूक होण्यासाठी पाच ते दहा लाख रुपयांचा मलिदा वरिष्ठांना देण्यास साधा लिपिक तयार झाला होता. यातून मोठी माया गोळा करून काहींनी आपले चांगलेच भले केले होते. विचार विनिमय करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या त्रिमूर्तीने पुढाकार घेऊन नवीन वाळू धोरण सुरू केले आहे.
या वाळू धोरणाचा प्रतिनिधिक स्वरूपात नायगाव श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनाच्या शुभ दिवशीच सहाशे रुपये किमतीला एक ब्रास चांगली उत्तम दर्जाची वाळू मिळत असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील ग्राहक वर्ग खूप झालेला आहे. आता घरकुल, सामाजिक इमारती इतर सार्वजनिक व खाजगी बांधकाम खर्चा मध्ये २५ ते ३० टक्के कपात होणार आहे. ही खऱ्या अर्थाने अच्छे दिन आल्याची सुरुवात झाल्याचे मत भाजप समर्थक धनाजी चव्हाण, शेखर पाटोळे व भाजप पदाधिकारी सांगू लागलेले आहेत.
हे आता खरं म्हणजे सुखद धक्का आहे. खोटे बोला पण रिटर्न बोला अशी छबी झालेल्या भाजपने काही चांगले निर्णय घेतले त्याचे मात्र स्वागतच केले पाहिजे अशीही प्रतिक्रिया उठू लागलेली आहे. सध्या या नवीन वाळू धोरणामुळे भ्रष्टाचाराचे पेढे व जिलेबी आता विसरा,,, नाहीतर डायबिटीस पसरा असा संदेश गेलेला आहे.
दरम्यान, या नवीन वाळू धोरणामुळे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केल्यास वाळूच्या डेपो पासून ते घरपोच आर. टी. ओ ने मान्यता दिलेल्या ट्रॅक्टर- ट्रक मधूनही वाळू वाहतूक होणार आहे. या वाहनांना जी. पी. एस. सिस्टीम बसवल्यामुळे भ्रष्टाचाराचा नायनाट होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Satara News | वडूजमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची गळती झाल्याने स्फोट ; दोन महिला जखमी
Satara News | वडूज नगरीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचा बांध फुटला ; प्रशासन हतबल
Satara News | वडूज नगरीमध्ये बेरोजगारांच्या मूलभूत गरजासाठी महा रोजगार मेळावा संपन्न