पुणे : उत्तरेकडील थंड वा-यांचे प्रवाह तीव्र झाल्यामुळे राज्याला अक्षरश: हुडहुडी भरली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दिवसेंदिवस तापमानाचा पारा चांगलाच खाली येताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात थंडी वाढली आहे.
उत्तरेकडील थंड वा-यांचे प्रवाह कायम असल्याने दिवसादेखील गारठा जाणवत आहे. हवामान विभागाने राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा दिला असून आज देखील अनेक जिल्ह्यात तापमान कमी होणार असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. सध्या मुंबई, पुणे, कोकण, विदर्भ, मराठवाडा यांसह ठिकठिकाणी तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत सध्या तापमान हे 20 अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. तर दुसरीकडे विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
आज अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, पुणे गोंदिया. परभणी थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर दिनांक 19 रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, व कोल्हापूर घाट विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. व 20 डिसेंबर रोजी सांगली व सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुण्यातील काही भागात किमान तापमान पुन्हा 10 अंशांखाली गेले आहे. पुण्यातील हवेली, माळीण, दौंड आणि शिवाजीनगर परिसरातील किमान तापमान 9 अंशांखाली नोंदवले गेले आहे. मागील चार दिवसांपासून हवामानातील बदल आणि निरभ्र आकाश यामुळे किमान तापमानात झपाट्याने घट झाली आहे. त्यामुळे पारा 10 अंशापर्यंत खाली आला.