Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘खरा हिशोब’ किती ? पर्यावरणप्रेमींचा सवाल; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी आणि फेरपंचनाम्याची मागणी

योगेश मारणेby योगेश मारणे
Wednesday, 30 September 2026, 16:29

न्हावरे : आलेगाव पागा (ता.शिरूर) परिसरातील आलेगाव पाझर तलाव येथील कथित अवैध मुरूम उत्खनन प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. महसूल विभागाच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात केवळ 246 ब्रास मुरूम चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर न्हावरे आऊट पोस्टचे सहाय्यक फौजदार शिवाजी भोते, आलेगावचे ग्राममहसूल अधिकारी आदित्य गायकवाड व आलेगावचे पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत पुन्हा पंचनामा करण्यात आला. मात्र, या कारवाईनंतरही प्रत्यक्ष किती मुरूम उपसला गेला. याचा संपूर्ण हिशेब समोर आला आहे का ? असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.

शिरूर पोलीस ठाण्यात खाण व खनिज अधिनियम कलम तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महसूल विभागाने दिलेल्या फिर्यादीनुसार, 10 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत आलेगाव पागा येथील आलेगाव पाझर तलाव परिसरातील गट नं. 575 मधील शासकीय गायरान पड जमिनीतून महसूल विभागाची परवानगी न घेता मातीमिश्रित मुरूमाचे अवैध उत्खनन करून त्या मुरुमची चोरी करण्यात आली. एकूण 246 ब्रास मुरूम, प्रति ब्रास 1060 रुपये प्रमाणे अंदाजे 2 लाख 60 हजार 760 रुपये किमतीचा असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

मात्र, पर्यावरणप्रेमींच्या म्हणण्यानुसार, हा आकडा केवळ संबंधित प्रकरणातील मर्यादित उत्खननाचा असून, आलेगाव पागा पाझर तलाव परिसरात झालेल्या एकूण उत्खननाचे प्रमाण 10 हजार ब्रासपेक्षा अधिक असल्याचा दावा करण्यात येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कारवाईला विलंब का?

 

या प्रकरणाचा सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यापूर्वीच तक्रार करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित प्रकरणाची चौकशी करून शासनाच्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. असे असताना संबंधित ठिकाणी तातडीने प्रभावी कारवाई का झाली नाही? जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर नेमकी कधी आणि कितपत झाली? याचीही उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

246 ब्रासचा पंचनामा; मग सुमारे 10 हजार ब्रास मुरुमाचे काय ?

पर्यावरणप्रेमींच्या दाव्यानुसार, पाझर तलाव परिसरातील मोठ्या भूभागावर मुरूम उत्खनन झाल्याचे दिसून येते. मात्र, महसूल विभागाच्या पंचनाम्यात केवळ 246 ब्रास उत्खननाची नोंद झाली असल्याने त्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रत्यक्ष उत्खननाचे क्षेत्र किती? खोली किती? एकूण घनफळ किती? आणि त्यातून प्रत्यक्ष किती ब्रास मुरूम बाहेर काढण्यात आला? याचे शास्त्रीय पद्धतीने मोजमाप झाले आहे का, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

विशेष म्हणजे सध्या पाझर तलावात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असल्याने पूर्वी झालेल्या उत्खननाचा प्रत्यक्ष मागोवा घेणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. त्यामुळे उपलब्ध महसूल नोंदी, पूर्वीचे पंचनामे, जमिनीचे क्षेत्रफळ, उत्खननाची खोली तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे उत्खननाचे प्रमाण निश्चित करावे, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.

‘तोडपाणी’च्या आरोपाचीही चौकशी करा

दरम्यान, काही पर्यावरणप्रेमींनी महसूल विभागाच्या कारवाईवर गंभीर संशय व्यक्त करत ‘तोडपाणी’ झाल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपाला अधिकृत दुजोरा अथवा स्वतंत्र पुरावा अद्याप समोर आलेला नाही.

त्यामुळे अधिकारी-कर्मचारी आणि कथित मुरूम उत्खनन करणाऱ्यांमध्ये कोणती आर्थिक तडजोड झाली का? कथित उत्खनन करणाऱ्यांची ओळख समोर आली असूनही त्यांच्याऐवजी अज्ञाताविरुद्धच गुन्हा दाखल झाला का? पंचनाम्यात प्रत्यक्ष उत्खननापेक्षा मुरूमाचे कमी प्रमाण का नोंदविण्यात आले? या सर्व बाबींची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. संपूर्ण प्रकरणाची पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन स्वतंत्र फेरपंचनामा व मोजमाप करावे,अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

तसेच पूर्वी करण्यात आलेल्या पंचनाम्यांची तुलना करून, प्रत्यक्ष उत्खननाचे प्रमाण निश्चित करावे आणि शासनाचा संभाव्य महसूल व दंडाची रक्कम निश्चित करावी. जर चौकशीत कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्याची कर्तव्यात कसूर किंवा अनियमितता आढळली, तर लागू कायदे व सेवा नियमांनुसार संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशीही मागणी आहे.

‘दिखाऊ कारवाई’च्या चर्चेला प्रशासन पूर्णविराम देणार का?

246 ब्रास मुरूम चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने कायदेशीर कारवाईची सुरुवात झाली असली, तरी आलेगाव पागा पाझर तलाव परिसरातील कथित मोठ्या प्रमाणावरील उत्खननाचा संपूर्ण हिशेब अद्याप स्पष्ट झालेला नाही, असा पर्यावरणप्रेमींचा दावा आहे.

त्यामुळे आता केवळ गुन्हा दाखल करण्यापुरती कारवाई न करता अवैध उत्खननाचे प्रत्यक्ष प्रमाण, संबंधितांची ओळख, वापरण्यात आलेली यंत्रसामग्री व वाहने, शासनाचा बुडालेला महसूल आणि पूर्वीच्या तक्रारींवर झालेली कार्यवाही या सर्व बाबी तपासणे गरजेचे आहे.

“कागदावर 246 ब्रास आणि प्रत्यक्षात हजारो ब्रास उत्खननाचा दावा—या दोन्ही आकड्यांमधील सत्य प्रशासनाने जनतेसमोर आणावे,” अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.आता वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणीतून आलेगावच्या मुरूम उत्खननाचा खरा ‘हिशेब’ बाहेर येणार का? याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

“आलेगावातील मुरूम चोरीप्रकरणी घटनास्थळाभोवतीच्या मोबाईल लोकेशनचा पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यास, संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेऊन तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळू शकते.” त्यामुळे संबंधित मुरूम चोर सापडू शकतात अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भिगवणमधील वसुली प्रकरणात आरोपीला जामीन! इंदापूर न्यायालयाचा आदेश; ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका

Thursday, 1 October 2026, 18:22

कराड प्रकरणात नवा ट्विस्ट! धनंजय मुंडें तातडीने मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला,नेमकी कशावर चर्चा?

Thursday, 1 October 2026, 18:12

खंडाळा एक्झिटवर पर्यटकाकडून ऑनलाइन पैसे उकळले; महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Thursday, 1 October 2026, 18:02

माझ्या समोर बाळूदाला मारलं’ पप्या शिंदे जेलमध्ये ढसा-ढसा रडला! डायरेक्ट खऱ्या मारेकऱ्याचं नाव सांगितलं; नेमकं काय घडलं?

Thursday, 1 October 2026, 17:57

मेरठच्या ‘ब्लु ड्रम’ हत्याकांडात मुस्कान अन् साहिल दोषी! फाशी होणार की जन्मठेप? कोर्टात नेमकं काय घडलं?

Thursday, 1 October 2026, 17:41

99 टक्के भागीदारी असलेल्या पार्थ पवार यांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्यात हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

Thursday, 1 October 2026, 17:39
Next Post

१ ऑक्टोबरपासून देशात होणार मोठे बदल! एलपीजी सिलिंडर, एटीएम चार्जेस अन् जन्म-मृत्यू नोंदणीच्या नियमांत बदल; जाणून घ्या सर्व अपडेट्स

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp