पुणे : महराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची अतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेत ग्रामीण भागातील मुलाने राज्यात बाजी मारली आहे. शेतकऱ्याचा मुलगा राज्यात प्रथम आला. कोल्हापूर जिल्ह्यातील मुदाळ गावचा सुपुत्र विनायक पाटील याने मुलांमध्ये प्रथम क्रमांक, तर पूरा वंजारी हिने मुलीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
आयोगातर्फे गुरुवारी (दि.१८) उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि त्याच दिवशी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे विद्याथ्यांना सुखद धक्का बसला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ मध्ये विनायक नंदकुमार पाटील यांनी ६२२ गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला आहे. धनंजय बांगर यांनी ६०८ गुण, तर सौरभ गावंडे अंतिम यांनी ६०६ गुण मिळवले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सर्वात मोठी ६१३ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ बाबत अनेक उमेदवारांना उत्सुकता होती. आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आणि लांबत जाणारे निकाल, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
शेतकऱ्याच्या मुलाची आकाशाला गवसणी
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ मध्ये प्रथम क्रमांक मिळवणारा विनायक पाटील हा कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील मुदाळ गावाचा सुपुत्र असून प. बा. पाटील माध्यमिक विद्यालय व जुनियर कॉलेज चा माजी विद्यार्थी आहे. त्याने सहा महिन्यापूर्वी पहिल्या प्रयत्नात उपशिक्षणाधिकारी आणि आता उपजिल्हाधिकारी म्हणून यश मिळवले आहे.
त्याला ६२२ गुण मिळाले तर धनंजय पाटील ६०८ गुणांसह राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुलींमध्ये पहिली आलेली पूजा वंजारी हिला ५७० गुण मिळाले. विनायक पाटील यांचे वडील शेती करतात. त्यांनी राज्यसेवेच्या दुसरा प्रयत्नात हे उल्लेखनीय यश मिळवले. पहिल्या प्रयत्नातून उपशिक्षणाधिकारी पदासाठी त्यांची निवड झाली होती. त्याचे शिक्षण पुणे येथील फर्ग्रसन महाविद्यालयात झाले. संख्याशास्त्र विषयात त्यांनी पदवी मिळवली.