पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडी ओसरल्याचे जाणवत आहे. राज्यातील शहरांमध्ये तापमान वाढल्यामुळे उकाड्याने प्रमाण वाढले आहे. मात्र , 20 जानेवारीला राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जसे की पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यामध्ये किमान तापमानात 3 अंशांनी घट झालेली दिसून येत आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार , पुणे शहरात 20 जानेवारीला सकाळी काही प्रमाणात धुके आणि नंतर निरभ्र आकाश असण्याची शक्यता आहे. शहरातील तापमान कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस एवढे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यामधील किमान तापमानात काही प्रमाणात घट झाल्यामुळे गारवा जाणवण्याची शक्यता आहे.
तर पश्चिम महाराष्ट्रातले दुसरे शहर सांगलीमध्ये 20 जानेवारीला निरभ्र आकाश असेल. सांगलीतील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांगलीमधील तापमानात 1- 2 अंशांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तर हवामान विभागाने वर्तवल्यानुसार साताऱ्यामध्ये निरभ्र आकाश दिसणार आहे. साताऱ्यातील किमान तापमानात देखील घट झालेली दिसून येत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोलापूर शहरात निरभ्र आकाश असेल. सोलापूरमधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असू शकते. तर कोल्हापूरमध्ये 20 जानेवारीला निरभ्र आकाश असू शकते. कोल्हापूरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.